DIVA MALVU NAKA

Author : NARAYAN DHARAP

ISBN No : 2405202015

Language : English

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MANORAMA PRAKASHAN


मला कोडे पडले होते ते मला दिसलेल्या (किंवा जाणवलेल्या) प्रकाराचे. तेथेच मनाचा खऱ्याखोट्याचा गोंधळ होत होता. डोळ्यांनी दिसते तेवढे खरे म्हणणाऱ्या लोकांनाही मालिनीच्या त्या छायेचे अस्तित्व मान्य करावे लागले असते-बापूसाहेबांची उशी ओलिचिंब झाली होती; ती त्यांच्या घामाने का मालिनीच्या केसातून ठिबकणाऱ्या पाण्याने ? का मला खरोखर काही दिसलेच नव्हते; दिसल्यासारखे वाटले तो एक केवळ प्रक्षेप होता ? बापूसाहेबांच्या अपराधी, भयग्रस्त मनाने प्रायश्चित्त म्हणून स्वत:समोर उभ्या केलेल्या चित्रांचा काही एका अपवादात्मक सहभावनेने माझ्या मनात प्रक्षेप झाला होता? पण तो इतका अर्थपूर्ण, सर्वस्पर्शी असेल ? स्पर्श, गंध, थंडी सर्वांसहित येईल?
पहाटेचा मोतिया प्रकाश झिरपत आला. विश्व प्रकाशात शिरत होते. बापूसाहेबांचे मृत शरीर, त्यांच्या आयुष्यातले लहानसहान हेवेदावे, रागलोभ हे सर्व क्षुल्लक वाटत होते. गावात निरोप द्यायला जाताना मी त्यांच्या वस्त्राच्छादित आकारावर शेवटची नजर टाकली. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात ते किती क्षुद्र होते! पण त्यांच्या त्या एका दुष्कृत्याच्या परिमार्जनासाठी मानवी अनुभूतीच्या परिघाबाहेर वावरणाऱ्या काही गूढ, अनाकलनीय, महाप्रभावी शक्ती काही क्षणापुरत्या त्यांच्यावर एकवटल्या होत्या. त्यांच्या पापी आयुष्याचा चुराडा करून मग आपल्या अगम्य मार्गावरून पुढे गेल्या होत्या. मी त्या विलक्षण नात्यात सहभागी झालो हा एक अपवादच!

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories