Author : P L DESHAPANDE
ISBN No : 2605202031
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SHRIVIDYA PRAKASHAN
पुणे विद्यापीठाच्या रवीन्द्रनाथ टागोर व्याख्यानमालेत मी १९८० च्या, २८ व २९ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी ही तीन व्याखाने दिली होती. ती आता पुस्तकरुपाने प्रसिध्द होत आहेत.
रवीन्द्रनाथांचे जीवन अनेक अंगांनी विकसित झालेले आहे. ही व्याख्याने काही अंगांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधावे ह्या हेतूने तयार केलेली आहेत. ह्या माझ्या प्रयत्नातून मराठी वाचकाच्या मनात रवीन्द्रसाहित्य वाचायची ओढ निर्माण झाली तर रवीन्द्रांचे जीवन, साहित्य आणि रवीन्द्रसाहित्याच्या समीक्षकांनी लिहिलेले लेख यांचा अभ्यास करण्याच्या माझ्या धडपडीचे चीज झाले असे मला वाटले.
~ पु. ल. देशपांडे