Author : SUHAS SHIRWALKAR
ISBN No : 2905202025
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SHASHIDEEP PRAKASHAN
१९८२ पासून कॉलेजमध्ये असणाऱ्या आणि कॉलेजमधून बाहेर पडलेल्या लहानथोर सर्वांनाच आपलेसे करणारी सुहास शिरवळकर यांची ही दुनियादारी आहे. पुण्यातील कॉलेजमधील घटना, प्रसंग, व्यक्ती कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्या, तरी हे नाट्य देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये घडू शकतं, याची खात्री पटते. काल्पनिक आणि सत्याची अप्रतिम सरमिसळ असलेलं हे कथानक. कोणत्याही कॉलेजमध्ये, कोणत्याही घरात, कोणाच्याही अवती भवती घडणारी ही कथा आहे. मैत्री, शत्रुत्व, आनंद, दु:ख, हेवेदावे, मत्सर अशा अनेक भावनांचा येथे कल्लोळ आहे.
दोन पिढ्या, आणि त्यामधील नातेसंबंध, भावनिक अंतर याचाही वेध आहे. पुन:पुन्हा वाचावं, वाचतच राहावं अशी प्रवाही आणि तरुण ताजी बिनधास्त भाषा हा कादंबरीचा आत्मा आहे. म्हणूनच कोणत्याही क्षणी उठावं आणि दुनियादारीच्या या कट्ट्यावर जाऊन बसावं! तुमची, माझी, आपल्या मित्रांची. घराघरातून नित्य घडत असणारी. म्हणूनच, जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद, दु:ख, प्रेम-मत्सर.. या भावना मानवी मनात अनंत आहेत; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, तो पर्यंत ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे.