KATHPUTLI

Author : KUSUM ABHYANKAR

ISBN No : r71

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : AJAB PUBLISHER


मी शेवटचं सांगतोय अतुल, लक्षात ठेव - मला सून डॉक्टरच हवी- एवढा मोठा दवाखाना आहे माझा. अक्षरश: रक्ताचं पाणी करून तो नावारूपाला आणला आहे मी- तो काय दुसऱ्याला देण्यासाठी? तू सर्जन झालास हे उत्तमच झालं; पण सूतिकागृहाचं काय? ते सांभाळायला कोणीतरी हवंच की-’ महेश्वर अतुलला बजावत होते. ‘तुला लग्न करायचंय- ठीक आहे. आता घरात सून आणावी असं मलाही वाटतंय. कोणतीही मुलगी आण. तुझ्या पसंतीची, कोणत्याही जातीची चालेल- फक्त ती हिंदू हवी- जातीभेद पाळणारा मी नाही. फक्त मुलगी परधर्मीय नको. मुसलमान तर मुळीच नको-’ ‘पण बाबा-’ ‘अं- हं- आधी माझं पुरतं ऐकून घे- मुलगी महाराची असली तरी चालेल-’ ‘अहो- काय- काय बोलताय?-’ उमाबाई चाचरत म्हणाल्या. ‘मग यात तुला काय एवढं आश्चर्य वाटलं? निदान तुला तरी नको एवढं आश्चर्य वाटायला-’ उमाबाईंकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकीत महेश्वर कुत्सित स्वरात म्हणाले, ‘अतुल- माझी अट एकच. मला सून डॉक्टर हवी-’

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories