Author : SANIYA
ISBN No : 2705202012
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : NAVINYA PRAKASHAN
माणसामाणसातील नातेसंबंधाचा शोध ह सानिया यांच्या या कथासंग्रहाचे वैशिठ्य आहे. नेहमीप्रमाणेचं त्यांच्या या कथा स्त्रीप्रधान आहेत. शहरी, सुशिक्षित स्त्रीयांचे भावविश्व या कथांमधून प्रकट होते.
'वय' या कथेतील अश्विनी व कुमारमधील हळुवार नाते, 'हिवाळ्यातला पहिला दिवस'मधील प्रा. बर्वे यांचे कॉलेजविश्व, 'पावसाळ्यातली गोष्ट'मधील मोनिका आणि लेखकाचे नाते, 'शिल्लक' मधील नायिका आणि संतोषमधील संबंध, 'स्रोत'मधील किशोरी अशा व्यक्तिरेखा आणि नाती विचारप्रवृत्त करतात. आपापसातील नातेसंबंध शोधताना माणूस समजावून घेण्याचाही प्रयत्न करतात. नातेसंबंधातून जे मिळते, ते काय असते याचा शोध घेण्याचा प्रयत्नही कथांमधून दिसून येतो.