Author : SHIRISH KANEKAR
ISBN No : 9788174241412
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RAJA PRAKASHAN
Currently Unavailable - Still you can add in CART.
विविध विषयांवर खुसखुशीत, चटकदार लेखन करणे हे शिरीष कणेकर यांचे वैशिष्ट्य आहे. एखादा विषय, गोष्टीतील उणीवा ते असा लेखनातून दाखवून देतात. याचा प्रत्यय 'एक्केचाळीस' या त्यांच्या लेखसंग्रहातून येतो. पुस्तकाच्या नावापासून यातील वेगळेपण लेखनातून दिसते.
पोट भरण्यासाठी आणि गाण्याची हौस भागवून घेण्यासाठी 'ऑर्केस्ट्रा' नावाचा काला प्रकार सुरु आहे, असे सांगत त्यांनी त्यावर टिप्पणी केली आहे. चित्रपटांमधील स्थित्यंतर, अभिनेत्रींचे सौंदर्य व अभिनय गुण. अशा विविध चित्रपटांशी संबंधित लेख पुस्तकातील 'फिल्लमबाजी' या भागात आहेत.
'अवलिये' या प्रकरणात त्यांनी ओ. पी. नय्यर, राम गणेश गडकरी, लता मंगेशकर, त्यांचे मित्र अविनाश खर्शीकर, नरेश कोळेकर तसेच सनी लिओनी, इसक मुजावर आदींचे व्यक्तीविशेष सांगितले आहेत. सचिनचे आत्मचरित्र, अनुभवाचे भांडवल, 'हास्यरंग' मध्ये कलाकार, नेते, सामान्य नागरिक यांच्या सवयी, त्यांची विधाने यावर लिखाण करून वाचकांच्या मनात हास्य फुलविले आहे.