Author : V S KHANDEKAR
ISBN No : 9788184984095
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे. मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता. आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..