GOLANDAJ ANI KANCHAN

Author : BABURAO ARNALKAR

ISBN No : B074CXWC4N

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : BookHungama


गोलंदाजाने आणखी एक सिगारेट पेटविली आणि टेबलावरील प्याल्यातील मद्याचा घुटका घेत विचार केला की, त्या पथिकाश्रमाइतकी कंटाळवाणी जागा सर्व गोव्यात दुसरी असू शकेल काय? निदान त्याला तरी तेथले वातावरण अगदी भकास वाटले होते आणि बसण्याचा कंटाळा आला होता. तेथले खाद्यपदार्थ, मद्य आणि माणसेही त्याला आवडली नव्हती.
पण तरीही गोलंदाज आपल्या खुर्चीला चिकटून बसला होता आणि त्याने ते सबंध टेबल स्वतःसाठी राखून ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्या कोंदट आणि अरुंद जागेत आणखी कुणी बसण्याची कल्पना त्याला सहन झाली नसती.
‘साहेब, तुम्हाला आणखी काही हवे आहे काय?’ तेथल्या खप्पड गालाच्या आणि खिन्न मुद्रेच्या वेटरने विचारले.
‘नको.’ गोलंदाज म्हणाला, ‘पण तू मला तुझा पत्ता लिहून दे, म्हणजे, मला काही हवे असले तर मी तुला पत्र लिहीन.’
तो वेटर काही रोखठोक उत्तर देण्याच्या विचारात होता. पण त्याने गोलंदाजाचे भरदार खांदे, बेदरकार चेहरा आणि निळे डोळे पाहिले आणि काही कारणामुळे आपला विचार बदलला. तो जरी विशेष बुद्धिमान नसला तरी स्वतःची कातडी सांभाळण्याइतकी बुद्धि त्याच्यात खचित होती.
गोलंदाजाला खूप मित्र होते तसेच शत्रूही होते आणि तो त्या पथिकाश्रमात बसला असताना नव्या शत्रूंबद्दल आणि आगामी युद्धाबद्दल विचार करीत होता. काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या माणसाने टेलिफोनवरून माहिती देईपर्यंत त्याला त्या पथिकाश्रमाची माहिती नव्हती. पण एका दृष्टीने त्याचे ते सुदैवच म्हणावयास हवे होते.
तो तेथे आल्यापासून तेथल्या व्यवस्थापकाने, तेथल्या खिन्न मुद्रेच्या त्या वेटरने आणि बेकार आचाऱ्याने त्याला निरुत्साही आणि नाराज करण्याचा कमालीचा प्रयत्न केला होता. तरीही तो आपल्या खुर्चीला चिकटून बसला होता.
‘साहेब, तुम्ही कुणाची वाट पाहात आहात काय?’ शेवटी त्या वेटरने धीर करून विचारले.
‘होय.’ मान हलवीत गोलंदाज म्हणाला, ‘मी तुमच्या कोकिळेसाठी थांबलो आहे. तिच्या कार्यक्रमाला केव्हा सुरुवात होते?’
‘साहेब, ते काही ठरलेले नसते.’ तो वेटर अधिकच दुःखाने म्हणाला, ‘कधी लवकरच होतो तर कधी उशीराही होतो. माझ्या बोलण्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेलच?’
‘तुझ्याइतकेच अर्थपूर्ण आणि मधुर बोलणारा माणूस मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत भेटलेला नाही.’ गोलंदाज म्हणाला.
अखेर तेथले कंटाळवाणे वाद्यवादन थांबले. वादकांनी आपल्या कपाळावरील घाम पुसला. ते व्यासपीठाजवळच्या छोट्या दारातून बाहेर गेले आणि तेथे शांतता पसरली.
अधिक जाणून घेण्यासाठी आजच हे इ-बुक खरेदी करा.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories