Author : BABURAO ARNALKAR
ISBN No : B074CXX7JQ
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : BookHungama
तुम्हांला नेलँड स्मिथकडून अगदी शेवटचे असे पत्र कधी आले होते?’ माझ्या पाहुण्याने विचारले.
मी क्षणभर विचार करून म्हणालो, ‘दोन महिन्यांपूर्वी. मला वाटते त्याला पत्रव्यवहाराचा कंटाळा असावा. शिवाय तो चांगल्या मनःस्थितीत नसावा असे दिसते.’
‘काही आईची भानगड आहे की काय?’ पाहुण्याने विचारले.
‘तसेच असावे. पण तो मला दाद लागू देणार नाही.’ मी उत्तर दिले.
माझे पाहुणे रेव्हरंड एल्थाम हे चीन देशामध्ये “बंडखोर मिशनरी” या नावाने प्रसिद्ध होते. हाच एरव्ही शांत दिसणारा माणूसच बॉक्सरच्या बंडाचा जनक होता.
ते म्हणाले, ‘पेट्री, माझ्या मनात त्या भयंकर चिनी माणसाबद्दलचे विचार वारंवार येत असतात. जर डॉक्टर फू-मांच्यू जिवंत असला तर जागतिक शांततेला अद्यापही धोका आहे. दोनच वर्षांपूर्वी तो आपल्या जवळ आला होता आणि तेव्हापासून आपण त्याच्या भयंकर हिरव्या डोळ्यांचा शोध करीत प्रत्येक छाया तपासून पाहात आहोत. पेट्री, तो नाहीसा झाला पण त्याच्या त्या ठगांच्या टोळीचे काय झाले? तुम्ही नेलँडबरोबर इजिप्तमध्ये त्याचा शोध केला होता ना? मला वाटते त्यावेळी तुम्ही कारामन्हेचा शोध चालविला होता.’
‘होय, पण आम्हाला त्याचा पत्ता लागू शकला नाही.’ मी म्हणालो, ‘कारामन्हेही कुठे नाहीशी झाली.’