DUSRI ZUNJ

Author : BABURAO ARNALKAR

ISBN No : B074CYM236

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : BookHungama


झुंजारने आपली करमणूक करण्यासाठी एक अभिनव मार्ग शोधून काढला होता. ‘महाभारत’ स्टोअर्समध्ये त्याने सेल्समनची नोकरी धरली होती व तो लहान मोठी घड्याळे विकत होता. ‘महाभारत’ हे मुंबईतले एक नव्यानेच सुरू करण्यात आलेले प्रचंड स्टोअर्स होते व तेथे मनुष्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू मिळत होती. सुईपासून कुऱ्हाडीपर्यंत तर साध्या लाटण्यापासून पलंगापर्यंत आणि मण्यांपासून हिऱ्यांपर्यंत सर्व काही तेथे होते. पुस्तके, औषधे, चैनीच्या वस्तू, भांडी, धान्य, खाद्यपेये त्या स्टोअर्समध्ये मिळत असत. ‘महाभारत’ हे त्या स्टोअर्सचे नाव अगदी सार्थ होते.
झुंजारने त्या स्टोअर्समध्ये नोकरी पत्करल्यानंतर त्याला घड्याळांच्या विभागात काम देण्यात आले. त्याने काही आठवड्यातच विक्रीचे सर्व उच्चांक मोडले होते व त्याचे नाव खुद्द भारद्वाज शेटजींच्या कानावरही गेले होते. भारद्वाज शेटजी ‘निर्वासित’ होते व निर्वासित असल्यामुळेच त्यांना इतक्या प्रचंड प्रमाणावर धंदा करता येत होता.
अर्थातच केवळ गंमत म्हणून झुंजारने ती नोकरी पत्करली नव्हती. त्याला मनगटावरील, भिंतीवरील किंवा राजाबाई टॉवरसारख्या इमारतीवरीलही घड्याळांबद्दल मुळीच आकर्षण वाटत नव्हते. तो काही सामान्य चोर नव्हता. त्याला चांगलाच हात मारायचा होता व त्यासाठी तो आपला मार्ग साफ करीत होता. कंबोडच्या सुलतानाचे सिंहासन पळविण्याचे त्याने ठरविले होते.
भारद्वाज शेटजींना जाहिरातबाजीची विद्या अवगत होती. जेव्हा कंबोडचा कुप्रसिद्ध सुलतान आपले ऐतिहासिक सिंहासन विकण्यासाठी मुंबईस येणार आहे असे समजले त्याबरोबर त्यांनी सुलतानाबरोबर वाटाघाटी सुरू केल्या व आपल्या स्टोअर्समध्ये ते प्रदर्शनासाठी ठेवण्याबद्दल झुंजारने सुलतानाची संमति मिळविली. याबद्दल अर्थातच बरीच खळबळ झाली होती व त्यामुळेच झुंजारचे त्या सिंहासनाकडे लक्ष गेले.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories