Author : OMKAR VARTALE
ISBN No : 9789387962064
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : NAVINYA PRAKASHAN
पर्यटनासाठी भारतात कोठेही गेला, तरी एक तरी त्यात मंदिराची भेट असतेच. त्यातच महाराष्ट्राचे वर्णन 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असेही करतानाच 'मंदिरांच्या देशा' असेही केले पाहिजे, अशी अपेक्षा ओंकार वर्तले यांनी व्यक्त करीत महाराष्ट्रातील मंदिरांचा परिचय 'मंदिरांच्या देशा' मधून केले आहे. यात पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर, रायरेश्वर, तासुबाई, म्हैसोबा, कुकडेश्वर, पळसदेव, पाच पांडव मंदिर अशा १९ मंदिरांचा समावेश आहे. सातारा,नगर, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, ठाणे, रत्नागिरी व जळगाव जिल्ह्यातीलही प्राचीन मंदिरांचा इतिहास व भूगोल यातून वाचायला मिळतो. यात मंदिरांचे सौंदर्य, स्थापत्यशैली, शिल्पकला याचे वर्णन यात असून, जाण्याचा मार्ग, पाहण्याची ठिकाणे, राहण्याची व्यवस्था आदी माहितीही आहे.