Author : VISHWAS PATIL
ISBN No : 9788174340504
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RAJHANS PRAKASHAN
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी. पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: मथुराबाई सार्वजनिक वाचनालय, बीडतर्फे दिला जाणारा महात्मा फुले साहित्य व वाङ्मय पुरस्कार 1991-92 साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली 1992 रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार 1992 पुणे नगर वाचन मंदिराचा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार 1992 महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कै. वामन मल्हार जोशी पारितोषिक 1992-93 पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार 1992-93 मारवाडी संमेलन : घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार