Author : SHYAM TALVADEKAR
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : MAJESTIC PUBLISHING HOUSE
काईझेनचा थोडक्यात अर्थ, केवळ जगण्यासाठी सातत्याने करीत राहिलेल्या सुधारणा-गरज असो वा नसे!
ते `मेड इन जपान’ असेल तर दे!’’ असे म्हणणार्या ग्राहकाचा विश्र्वास जपानी वस्तूंनी वा कंपन्यांनी संपादन केला असेल तर तो काईझेनमुळेच.
कुठल्या समस्येच्या मूळ कारणाशी जाऊन समस्येचे अस्तित्वच नाहीसे करणे ही `काईझेन’ची खासियत. काईझेनमुळे कुठल्याही क्षेत्रातील कार्यक्षमतेचा अभाव नाहीसा होऊन, लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. स्वयंविकास घडून येतो. आणि जिकडे काईझेन करू तिकडे एखादा चमत्कार घडावा अशा प्रकारचा चांगला बदल दृष्टोत्पत्तीस येतो. वस्तू किंवा सेवेचा दर्जा उंचावतो. खर्च कमी करता येतो. पर्यायाने स्पर्धेला तोंड देता येते व आपला कामधंदा टिकू शकतो. आपले राहणीमान उंचावू शकते.
प्रस्तावनेतून...
``आम्ही जपान्यांनी काईझेन ही एक जीवनप्रणाली व जीवनशैली म्हणून घरादारात, शाळा-कॉलेजांत, कामावर, जिकडे जाऊन तिकडे राबवली. कारण काईझेन हे देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. स्वतःच्या व देशाच्या उद्धारासाठी आहे. तर सोप्या भाषेतील हे पुस्तक वाचाच व काया-वाचा-मने ते करा’’
-एम. शिरातोरी, भूतपूर्व मॉनेजिंग डायरेक्टर, टोयो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड, (पेरेन्ट कंपनीः टोयो इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन, टोकियो, जपान).