Author : V P KALE
ISBN No : 9788177665789
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
आपल्या अवतीभोवतीचेच जग आपल्या समोर उभे करणारे खुसखुशीत शैलीतील सहज लेखन. रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. आपल्या आयुष्याला बहरायला, फुलवायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे, मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे. वपुंची त्यांच्या आयुष्यातल्या छोट्याछोट्या प्रसंगांनी सजलेली ही ‘रंगपंचमी’कुठेतरी ‘आपल्याही आयुष्यात असं घडलं होतं बरं का’असं म्हणायला लावते. हसवते. खिन्नता आणते, विचारही करायला लावते.