Author : VIDYA HARDIKAR SAPRE
ISBN No : 9789384475659
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : GRANTHALI PRAKASHAN
माणसाचं आयुष्य प्रवाही तर असतंच, परंतु ते अनेक धारांनी वाहत असतं. साहित्यिक कलावंताना, खर तर प्रत्येक क्रिएटिव्ह व्यक्तीला, आयुष्याच्या या बहुप्रवाहीपणाची उत्कट जाणीव असते आणि जगण्याच्या मुख्य प्रवाहाल येऊन मिळणाऱ्या अनेकानेक लहान-मोठ्या धारांकडे सहजतेने सजगपणे पाहणारी एक अंतर्दृष्टीही या सगळ्यांजवळ असते. विद्या हर्डीकर-सप्रे यांचं ‘मांजरफन’ हे पुस्तक याच अंतर्दृष्टीचा प्रत्यय देणारं आहे.
ललित आणि विनोदी लेखांचा संग्रह असं या पुस्तकाचं ढोबळ स्वरूप आहे. यातल्या लेखांच्या विषयांचं वैविध्य आणि त्या त्या विषयाला अनुसरून असलेली चुरचुरीत किंवा गंभीर लेखनशैली वाचकाला कधी हसवणारी तर कधी त्याचे डोळे भरून आणणारी आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे देशी-विदेशी अनुभवांचा मिश्र गंध. विद्या हर्डीकर-सप्रे गेली अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. युरोपातल्या काही देशांचा प्रवासही त्यांनी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतलं कोर्ट, विमानतळावरचे कस्टम्सचे नियम, इंग्लंड मधला भवानी तलवारींचा शोध अशा विषयांवर तर त्या लिहित्या झाल्या आहेतच, परंतु त्यांच्या बरोबरीनं अस्सल कोकणी मातीतल्या खूप आठवणीही त्यांच्या या लेखनात उमटल्या आहेत.