WHEN WE WERE ORPHANS marathi

Author : KAZUO ISHIGURO

ISBN No : 9789389152012

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : WESTLAND PUBLICATIONS


साहित्याचे नोबल पारितोषिक विजेते; तसेच द रिमेन्स ऑफ द डे या बुकर पारितोषिक विजेत्या कादंबरीचे लेखक काझुओ इशिगुरो, यांच्या कल्पनाशक्तीची ही उत्तुंग भरारी. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला शांघायमध्ये जन्मलेला; वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वेगवेगळ्या प्रसंगी आईवडील परागंदा झाल्यामुळे अनाथ झालेला बँक्स. या गोष्टीला आता जवळपास वीस वर्षांहूनही जास्त काळ लोटल्यावर बँक्स आता लंडनमधील एक प्रतिष्ठित असामी बनला आहे. पण ज्या तपासकौशल्यांनी त्याला प्रसिद्धी मिळवून दिली आहे, ती कौशल्ये काही त्याच्या पालकांच्या कथित अपहरणाचा माग काढण्यात फारशी कामी येत नाहीयेत. आपल्या वेदनादायी भूतकाळाचे रहस्य सोडवण्याच्या आशेने बँक्स आपल्या आठवणीतल्या त्वेषाने खदखदणाऱ्या आणि चक्रव्यूहासारख्या, शांघायला जातो. तिथे गेल्यावर त्याच्या समोर येते युद्धामुळे ओळखता न येण्याइतपत विद्रूप झालेलं शांघाय आणि आजूबाजूच्या माणसांइतक्याच बेभरवशी झालेल्या त्याच्या स्वतःच्या आठवणी. तसंच त्याला उमजतं की आपल्या आठवणीही आपल्या आसपासच्या लोकांइतक्याच बेभरवश्याच्या ठरत आहेत. व्यासंगी, गूढ आणि भावनोत्कट. व्हेन वी वेअर ऑर्फन्स ही कादंबरी स्मृतीच्या अस्थिरतेचे आणि आपल्या भूतकाळाचा सूड घेण्याच्या शक्यतेचे गहन चिंतन आपल्यासमोर ठेवते.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories