Author : PERUMAL MURUGAN
ISBN No : 9789387894747
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : WESTLAND PUBLICATIONS
एक गूढ पाहुणा कु ठूनतरी अवतरतो आणि एक नुकतंच जन्मलेलं करडू एका म्हाताऱ्या जोडप्याला भेट देऊन जातो. लवकरच, त्या छोट्याशा काळ्या शेळीचा - पूनाचीचा - नाजुकपणा आणि बहुप्रसवता हे तिच्या अवतीभवतीच्या सगळ्यांच्या नवलाचा विषय बनून जातात. अगदी तिच्यावर झडप घालू पाहणाऱ्या गरुडापासून ते तिला तोडात धरून पळवून नेऊ पाहणाऱ्या रानमांजरापर्यंत, सगळ्यांपासून वाचवून छोट्या पूनाचीला जगवण्यासाठी म्हातारा- म्हातारी जिवाचं रान करतात, कारण ती त्यांच्या छोट्याशा विश्वाचा केंद्रबिदूं बनून गेलीय.
शेतकरी, मेंढपाळ किंवा शेळ्या-यांच्यापैकी कु णाचही जगणं तसं सोपं नसतंच. पाऊस येत नाही, देव आपापल्या वाटचे बळी मागून मोकळे होतात आणि अरण्य या अजाण प्राण्यांना मोहवून फशी पाडायला टपलंय. या सगळ्यांतून, पूनाची कधी तिचं रक्षण करणाऱ्या तर कधी तिला घायाळ करणाऱ्यादेखील, मनुष्यप्राण्यांच्या वर्तणुकीची साक्षीदार होते, आणि त्यावर मूक प्रश्नचिन्हही उपस्थित करते. प्राण्यांच्या जगाची ही तरल, तरीही गुंतागुंतीची कथा, हे आपल्या काळावरचं, वर्ण-जातीच्या विषम उतरंडीवरचं आणि नाकर्त्याशासनाच्या लहरींना शरण जाण्याऐवजी आवाज उठवणं पसंत करणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींच्या वाढत्या असमर्थतेवरचं, असुरक्षिततेवरचं भाष्य आहे.