Author : SHANKAR PATIL
ISBN No : 9788177668698
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
शंकर पाटील यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी ग्रामीण कथाकार म्हणूनच ते अधिक लोकप्रिय झाले. ‘ताजमहालमध्ये सरपंच’ हा कायम टवटवीत राहतील अशा कथांचा संग्रह. या कथा म्हणजे खुसखुशीत विनोदाआडून घडवलेलं वास्तवदर्शनच! या संग्रहातील कथांमधून ग्रामीण राजकारण, जीवनशैली तसंच समाजातील काही नमुनेदार नगांचं चित्रण आढळतं. प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि चुरचुरीत विनोदाने बहरलेली दिसते. ती ठरवून लिहिलेली नाही तर उत्स्फूर्त वाटते. सहजता आणि सोपेपणा या वैशिष्ट्यांमुळं या कथा वाचकाच्या मनाला भिडतात.