SHRIYUT GANGADHAR TIPARE ARATHAT ANUDINI

Author : DILEEP PRABHAVALKAR

ISBN No : 9788174251391

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : utkarsh prakashan


दिलीप प्रभावळकरचे ‘अनुदिनी’ हे सदर मी सुरू झाल्या रविवारपासून अखेरपर्यंत नियमितपणे वाचले. याचे पहिले कारण दिलीपविषयीची आस्था; आणि दुसरे कारण त्यातला चटपटीत विनोदी मजकूर, भावनाप्रधान किंवा विचाराधीन होता-होता मध्येच वास्तवाचे भान आणून देऊन वास्तव आणि आदर्श यांतील विसंगती दाखवणे, ही दिलीपच्या विनोदाची पद्धती आहे. त्याच्या अभिनयातही ती आहे.
आपापल्या परीने वाजवी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब डायरी लिहिते, अशी कल्पना करून, त्यांच्या टीकाटिप्पणीमधून दिलीपने वर्षभरातल्या घडामोडींचा घेतलेला वेध म्हणजे ‘अनुदिनी.’ प्रत्यक्षात आजकाल फार कोणी अशी ‘वासरी’लिहीत नाही. त्यातून एकाच कुटुंबातले सर्वजण सातत्याने हा उद्योग करतील, हे तर संभवनीयच नाही. परंतु कोणा एका टिपरे कुटुंबाचे तीन पिढ्यांचे सदस्य रोजनिशी लिहितात, ही कल्पना कल्पना म्हणूनही फार सुरेख आहे. कारण त्या निमित्ताने चालू घडामोडींकडे वेगवेगळ्या वयाची माणसे कसे पाहातात, हे दाखवता आले आहे. शिवाय ही माणसे रोजनिशी लिहोत, न लिहोत; पण त्यांचे जे ‘चिंतन’ (शब्द थोडा विनोदी वाटतो) चालते, ते तर वास्तव आहे?
एका परीने सर्व घटनांकडे पाहाण्याचा हा सुखवस्तू मध्यमवर्गीय दृष्टिकोण आहे.
(यातली बरीच निरीक्षणे, दिलीपला, तो राहातो, त्या ‘शारदाश्रम’ वसाहतीतच मिळाली असणार, याची मला खात्री आहे.) हा मध्यमवर्गीय आज असुरक्षित आहे. देशाचे जे चालले आहे, त्यात उच्चभ्रू आपली सत्ता वाढवायचा प्रयत्न करीत आहेत, आणि त्यासाठी जमेल त्या भल्याबुऱ्या मार्गाने पैसा जमा करीत आहेत! हा पैसा उडवण्यासाठीची त्यांची साधने प्रतिदिनी वाढत आहेत.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories