Author : DR M M JAIN
ISBN No : 03082021M13
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : BIOGRAPHY
Publisher : utkarsh prakashan
डॉक्टर या शब्दाला एक वलय आहे, आदराची भावना आहे, विश्वासाचे नाते आहे. याच पायावर डॉ. एम. एम. जैन यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला आणि आयुष्यभर नैतिकता, मूल्य, यांची जपणूक केली. याची कहाणी द व्हाईट एप्रन मधून सांगितली आहे.
जैन समाजातील कर्मठ कुटुंबात मगनलाल जैन यांचा जन्म झाला. लहानपणापासून शिक्षणाची ओढ त्यांना होती. पुढे वैद्यकीय ज्ञान घेण्याच्या इच्छेने ते पुण्यात शिकायला आले. घरातून कोणतीही मदत न घेता उच्च शिक्षण घेतले. आंतरजातीय मुलीच्या प्रेमात पडले आणि विवाह बंधनातही अडकले.
याच दरम्यान 'एएफएमसी'तील नोकरी, नगर येथे रुग्णालयाची उभारणी ही सर्व कथा त्यांनी यात सांगितली आहे. पुण्यातील संघर्षमय आयुष्य डॉक्टरांनी यातून उलगडले आहे. युवा पिढीसाठी हे आत्मचरित्र प्रेरणादायी ठरेल.