Author : D M MIRASDAR
ISBN No : 9788184982282
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गाव-ओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.