Author : ARVIND GOKHALE
ISBN No : 05082021M02
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : CONTINENTAL PRAKASHAN
वंकटेश माडगूळकरांच्या कथा-वाङ्मयातून वेचक पंचवीस कथा निवडून त्या ह्या पुस्तकात एकत्रित केल्या आहेत. थोर कथाकारांच्या निवडक कथा एका पुस्तकात वाचावयास मिळाल्याने रसिकांची अनेक तर्हेने सोय होते. अशा कथालेखकांच्या सुमार कथा बाजूला सारून उत्कृट कथा वाचकांपुढे ठेवणे अवघड नसते; परंतु माडगूळकरांचा सामान्य कथांची संख्या हाताच्या बोटांइतकीही नसल्याने ह्या पुस्तकाची उभारणी करणे हे अवघड काम आहे. लेखकावर अन्याय करणारे आहे. माडगूळकरांनी निरनिराळ्या व्यक्तींवर व विषयांवर तर्हेतर्हेने लिहिले आहे - त्यातील एकेक प्रातिनिधिक कथेचा अंतर्भाव करून वरील अडचण अंशत: दूर केली आहे. लेखकाची पहिली प्रकाशित कथा जशी यात आहे तशी अगदी अलीकडचीही. माणदेशी वक्ती व गावाकडचे किस्से, आत्मवृत्तपर व त्याचबरोबर स्वत:च्या लेखनावरील, निसर्गपर व जनावरांसंबंधीच्या, शिकारीच्या, शेतक-याच्या, भुताखेताच्या, तमासगिराच्या, स्त्रीजीवनावर, शहरी समसेच्या - अशा सर्व धर्तीच्या कथांची हजेरी लावलेली आहे. एकाच कालखंडातील कथा न निवडता लेखकाने वेगवेगळ्या काळी लिहिलेल्या कथा निवडलेल्या आहेत. वंकटेश मांडगूळकरांच्या कथालेखनाचे अधिकाधिक स्पष्ट व संपूर्ण दर्शन ज्यायोगे घ