Author : V P KALE
ISBN No : 05082021M11
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RAJA PRAKASHAN
वपुंच्या कथांनी वाचकांच्या संवेदनांना हलकेच जागे केले, हलवले आणि प्रगल्भतेच्या प्रवासाला प्रवृत्त केले. पूर्णपणे अनलंकृत आणि सहजगर्भ शैलीतल्या वपुंच्या कथांनी मध्यमवर्गीय आयुष्यातील सुखदु:खे, मानापमानाचे अवघड प्रसंग, भावभावना आणि विकारविचारांची आंदोलने व्यक्त करणारी दुखरी नस पकडली शुद्ध जीवनातून विचारांतून, आपल्या आकलनाच्या खोलवरच्या चिंतनातून व्यक्त होणारे अनुभव आपल्या स्वप्रतिभेनं कथांमधून झळाळू लागले. सहस्त्रदल कमल सूर्य किरणांनी अलगद उमलावे तसे विविध प्रसंग कलाकृतींतून उमलावे लागतात. या कादंबरीत हे कमळ संपूर्ण उमलले आहे. ऐहिक जीवनाचारातून मनप्रवृत्तीला उंच नेणारी अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी प्रकाशवाट उजळणारी नायिका हे या कादंबरीचे बलस्थान आणि आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणार्या आजच्या मानवाचं प्रतिक म्हणजे ओंकारनाथ- या यशामागून येणारं निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणारा परंतु त्याचीही जाणीव नसणारा अशा मानवाला खर्या चैतन्याकडं, संपूर्ण आनंदाकडं बोटं धरून नेणारी ही कादंबरी वाचकालाही उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे असीम अविनाशी आनंदाचे दान देते.