Author : MADHAV VIDWANS
ISBN No : 05082021M12
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : MAJESTIC PUBLISHING HOUSE
‘’महाराष्ट्रात जुन्या-नव्या विचारांच्या सर्व हिंदू कुटुंबांमध्ये ज्यांचे नाव पूर्ण परिचयाचे झाले होते, ज्यांची मधुरवाणी, गोड स्वभाव, कडक शिस्त, असामान्य कर्तृत्वशक्ती, पतीवरील असीम भक्ती, रावसाहेब रानडे यांच्या सर्व बाबतीतील ध्येयांशी समरस होण्याची उत्कटेच्छा… इत्यादी गुणांमुळे ज्या सर्वांस आदरणीय झाल्या होत्या, त्या परमपूज्य श्री. रमाबाई रानडे ह्यास 26 एप्रिल 1924 रोजी देवाज्ञा झाली…
पुणे सेवासदन संस्थेची स्थापना आपल्या घरात करून त्या संस्थेशी एकजीव झाल्या. रमाबाईंच्या सर्व प्रकारच्या सामर्थ्याचा विकास संस्थेच्या कार्यात झाला. इतरांची दुःखे आपलीशी करून ती हलकी करण्याचा प्रयत्न करीत असता, त्यांनी स्वतःचे दुःख बाजूस सारले.
त्यांच्या कार्याचा परिघ वाढत होता, कार्ये वाढत होती, त्याबरोबर त्यांचे सामर्थ्यही वाढत होते. साधारणपणे पंचवीस कर्तृत्ववान माणसांनी जे कार्य सहज व्हावयाचे नाही ते कार्य रमाबाईंनी एकट्याने करून इहलोकीची यात्रा संपविली.’’
सुबोधप्रत्रिका 4 मे 1924