Author : M L BHAGWAT
ISBN No : 19082021M10
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MAJESTIC PUBLISHING HOUSE
आपण आपल्या आत्मवृत्ताचे हस्तलिखित मला वाचायला दिलेत, ते मी संपूर्ण वाचले. माझ्या मनावर पहिला ठसा उमटला, तो आपल्या भाषेचा, आपली भाषा साधी, सरळ पण प्रौढ आणि प्रसन्न आहे. लेखनाला ओघ आहे. आपल्या आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर आपल्याला पुढे नेणाऱ्या घटना घडत गेल्यामुळे वाचक कुतुहलाने वाचीत जातो. सचोटी, चिकाटी, निर्धार आणि सौजन्य हे आपल्या व्यक्तिमत्त्याचे विशेषही प्रसंगाप्रसंगातून दिसतात आणि ठसतात.
आपल्या विवाहानंतर आपल्या आयुष्याचे वळण बदलले. ते अधिक अर्थपूर्ण, भरीव आणि समृद्ध झाले हे आपण सांगितले आहे. तसे ते झाल्याचा प्रत्ययही येतो. आपण रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांपैकी आपले स्वत:चे आणि सौ. मंगलाताईंचे मनावर विशेष ठसते. आपलेपणा तटस्थता ह्यांचा योग्य तोल त्यांत ठेवला गेला आहे.