Author : H M MARATHE
ISBN No : 500036
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RIYA PUBLICATIONS
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी, सॉफ्टवेअर, मार्केट अशा त्यांच्या कादंबऱ्या जाणकार वाचकांच्या कौतुकाचा विषय झाल्या. अनेक कथांना मराठी वाचकांनी मनःपूर्वक दाद दिली.
अनेक नियतकालिकांचे यशस्वी आणि कुशल संपादक म्हणूनही ते मराठी वाचकांना उत्तम प्रकारे ज्ञात आहेत.
‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘घरदार’ ही मासिके, लोकप्रभा साप्ताहिक आणि नवशक्ती दैनिक ही त्यांनी संपादित केलेली नियतकालिके. ‘एक माणूस-एक दिवस’ या अभिनव व्यक्तिचित्रणात्मक लेखनप्रकाराचे आद्य जनकत्व त्यांच्याकडेच जाते.
‘बालकाण्ड’ ही आहे या लेखक, संपादकाच्या बालपणाची मन हेलावून सोडणारी कहाणी.