Author : SNEHAL JOSHI
ISBN No : 27042022M01
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : VIDYARTHI PRAKASHAN
Currently Unavailable - Still you can add in CART.
बॅनर्जीच्या खोलीतून थोड्या वेळाने शब्द कानावर आले, "उई मा खूब भालो, खूब शुंदर, खूप भाले लागे।" उसासे सोडत मि. बॅनर्जी असे बडबडत असताना मिसेस बॅनर्जी दामलेला हळूच म्हणाली, "अब क्या करेंगे? जल्दी जा के पकडना चाहिये नहीं तो खेल खत्म होगा ना?"
दामलेने तरीही स्तब्ध राहण्याची खूण केली. पाचदहा मिनिटांत बॅनर्जीच्या खोलीतले आवाज बंद झाले. पलीकडे असलेल्या रामचंद्रनच्या खोलीत काय चालले असावे ह्या विचारानेच सीतालक्ष्मी पार हवालदिल झाली होती. पाच-दहा मिनिटे अशीच गेली. हा साला रामचंद्रन शेवटी काहीतरी गडबड करणार असे प्रत्येकालाच वाटत होते. दामलेने सरतेशेवटी हुकूम सोडला, "अब चलो, "
पण ते सर्व बाजूच्या डुप्लेक्सच्या अंगणात येतात तर बॅनर्जीच्या खोलीतून त्याचे तारस्वरात ओरडणे ऐकू आले.
"उई मां, उई मां-चूहा, चूहा! हमें चूहाने काटा. उई मां रामचंद्रन, यहां बहुत चूहा है यार."
सारेच दचकून उभे राहिले. तेवढ्यात रामचंद्रनच्या खोलीतून किंकाळ्या ऐकू आल्या. "अरे, मर गया जी. साप, बडा साप. हमको काटा जी. अब हम जिंदा नहीं रहेगा जी. अय्योयी सीतालक्ष्मी S......