COLD CALL

Author : GANESH SHEVATE

ISBN No : 27042022M02

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : VIDYARTHI PRAKASHAN


तो सोनल होती! इतक्या रात्री तिचं अल्ताफकडे काय काम? नेल्सन भांबावला, डोळे ताणून ती पाहू लागला. आपली डौलदार चाल सोनलने दरवाज्याजवळं येताच थांबवली होती. मघाशी नेसलेली पिवळी साडी तिच्या अंगावर होती. वाऱ्यामुळे तिचा पदर हवेत उडत होता.

सोनलने हात उंच करून दरवाज्यावरची बेल दाबली. त्या नौरव शांततेत बेलचा अस्पष्ट आवाज नेल्सनपर्यंत पोचला. थोडा वेळ जाताच रूमचा दरवाजा उघडला गेला. नेल्सनने पाहिलं दरवाज्यात फक्त शॉर्ट्स घातलेला अल्ताफ उभा होता. त्याची काळी पिळदार देहवष्टी मंद प्रकाशातही उठून दिसत होती.

नेल्सनच्या अपेक्षेप्रमाणे त्याने सोनलला पाहताच आदब वगैरे दाखवली नव्हती! याउलट तो सहजपणे सोनलकडे पाठ करून आत निघून गेला होता! पाठोपाठ सोनलही आत शिरली होती, दरवाजाही तिनेच बंद केला होता!

नेल्सनला झटका बसला. त्याची छाती धडधडू लागली. त्याच्या मनात वेगळ्याच विचारांनी प्रवेश केला.....

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories