KSHETRANI SHIVSNUSHA TARARANI

Author : RAMESH SHANTINATH BHIVARE

ISBN No : 03052022m02

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : BIOGRAPHY

Publisher : SHALINI BOOKS


छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वराज्याची राजधानी रायगड औरंगजेबाने काबीज केली. महाराणी येसूबाई आणि संभाजी पुत्र बाल शाहूराजे यांना औरंगजेबाने कपटाने कैद केले. अशावेळी मराठ्यांच्या राज्याला ना राजधानी होती ना नेतृत्व होते. राजारामपत्नी छत्रपती ताराराणी यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. मोघली संकटाला त्वेशाने आणि प्रखारपणे सामना दिला.

या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामात जसे शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रेरणेचे महत्त्व होते तसे भद्रकाली छत्रपती ताराऊसाहेबांच्या मुत्सद्देगीरीचे, पराक्रमाचे आणि धैर्याचे मोल दिसून येते. राजा नाही, राज्य नाही, सैन्याला नेतृत्त्व नाही आणि हिंदुस्थानचा शक्तिशाली धर्मवेडा बादशहा आपल्या संपूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर तुटून पडतो तेंव्हा पंचवीस वर्षाची एक तरुण छत्रपती ताराराणी त्याला सामना देते, आणि विजयी होते. सत्तावीस वर्षे चाललेल्या या स्वातंत्र्य संघर्षात शेवटी मुघलांची हार झाली. तेव्हा या इतिहासाला जगात तोड नाही.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories