Author : ERLE STANLEY GARDNER
ISBN No : 9789387789685
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
" वेगळेच नाव धारण करून नॅन्सी बँक्स एक अगदी साधे काम घेऊन अॅटर्नी पेरी मेसनकडे आली. तिने रेसकोर्सवर डो बॉय नावाच्या एका घोड्यावर पाचशे डॉलर्स लावले होते. तिच्याकडे शंभर शंभर डॉलर्सची पाच तिकिटे होती. तो घोडा जर शर्यंत जिंकला असेल तर दुसरया दिवशी मेसनने रेसकोर्सवर जाऊन, ती तिकिटे खिडकीवर देऊन, जिंकलेले पैसे घ्यायचे होते आणि ती सांगेल त्या ठिकाणी तिला द्यायचे होते.
दुसNया दिवशी पैसे घेत असताना पोलीसच मेसनला अडवतात. त्याला कळते की, नॅन्सी बँकचा भाऊ रॉडने बँक्स याने माव्र्हिन फ्रेमॉन्टकडे नोकरी करत असताना पैशांची अफरातफर केली होती, ते पैसे त्याच घोड्यावर लावले होते आणि तो घोडा रेस जिंकला होता. माव्र्हिन फ्रेमॉन्टचे म्हणणे असते की नॅन्सी बँक्स त्यांची साथीदार होती, अपहार केलेले पैसेच घोड्यावर लावले आहेत आणि ते पैसे आणि रॉडने बँक्स याने कमावलेला नफा यावर त्याचाच हक्क आहे. रॉडने बँक्सला तर पैशांमधून त्याने चोरलेले पैसे रॉडने बॅक्स त्याला परत करू शकत होता. पण फ्रेमॉन्टला पैशांची भरपाई नकोच असते. रॉडने बँक्सला तुरुंगातच अडकवायचे असते, कारण त्याची बहीण नॅन्सी बँक्स हिने, तो तिच्या मागे लागलेला असताना त्याला दाद दिली नव्हती; उलट त्याला थप्पड मारून त्याचा अपमानच केला होता|
मेसन पैसे घेऊन ते पोचवायला नॅन्सी बँक्सकडे गेल्यावर ती त्याला रॉडने बँक्सचा जामीन भरण्यासाठी पैसे देऊन त्याची तुरुंगातून सुटका करायला सांगते. मेसन त्याचा जामीन भरतो आणि त्याची सुटका करतो. पैशांचे व्यवहार बघण्यासाठी तिने फोले मोहेलमध्ये एक केबिन भाड्याने घेतलेली असते. आपले काम पुरे झाले आहे या समजुतीखाली मेसन असताना त्याने परत तिला तातडीने भेटावे, असा तिचा निरोप मिळतो. परिस्थिती आणीबाणीची आहे असेही त्याला कळते. तो जेव्हा फोले मोटेलमध्ये जातो तेव्हा त्याला केबिनच्या स्नानगृहामध्ये माव्र्हिन फ्रेमॉन्टचे प्रेत पडलेले आढळते|
पेरी मेसन स्नानगृहामधून बाहेर येतो आणि नॅन्सी बॅक्स घाईघाईने केबिनमध्ये शिरते आणि त्याचे हात आपल्या हातात घेते. तिचे हात बर्फासारखे थंडगार असतात.
तिच्याशी उलटसुलट बोलल्यावर त्याच्या लक्षात येते, की तिने खरे तर प्रेत आधीच बघितलेले असते; पण तिची इच्छा असते की ते पेरी मेसनलाच प्रथम दिसले, असा सर्वांचा समज व्हावा|