Author : SURESH VAIDH
ISBN No : 22022023M01
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN
अशावेळी
'हो ना?' इराने त्याला तातडीने कबुली दिली, 'पण एक सांगू का तुला ? मी रात्रीचं आकाश जास्त बघत नाही... रिकामं रिकामं वाटायला लागतं. आयुष्यात कसली तरी पोकळी आहे वाटतं. आणि कसलीतरी गूढ, अनामिक हुरहूर जाणवते बघ.... मला शब्दात नाही सांगता येणार. पण ....कसलीतरी वेदना...काहीतरी...छे!' वैतागून ती थांबली.
राहूलला काहीसं हासू आलं. पहिल्यांदाच असं होत होतं
की, तिला स्वत:चे विचार स्पष्टपणे मांडता येत नव्हते. पण त्याने उघड हासू दाखवलं नाही. वरकरणी तो म्हणाला, 'मला समजलं. तुला काय म्हणायचे ते!'
परत तिथे शांतता पसरली. इरा अगदी कोऱ्या मनाने आकाशकडे बघत होती. आणि अचानक तिच्या कानावर राहूलचा प्रश्न आदळला.
'इरा तू कधी कोणावर प्रेम केलंस?
आधी तिला त्याचा प्रश्न नेमका कळला नाही. आणि कळला
तेव्हा तिच्या डोळ्या समोर राहूलचाच चेहरा आला.