Author : VINITA MANE
ISBN No : 22022023M04
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN
"आणि तो देव्हारा?" आदेशने विचारले. "तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का ? तसे पण देव्हाऱ्यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खूप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात अभिची मूर्ती विराजमान आहे. ती कशी हलवू ?"