Author : SHUBHANGI GAAN
ISBN No : 22022023M05
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN
'कोर्टात आपल्या वक्तव्यामुळे समोरच्याची घाबरगुंडी उडवणारा आमचा सिद्धेश असा एका स्त्रीमुळे नामोहरम हातो, पराभूत होतो. योग्य नाहीय मुला. तू हरायचं नाहीस आणि तू हरलेला नाहीस. हरलीय ती. एका सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्त्वाचा तिने अव्हेर केलाय. ती सुखी निश्चितच होणार नाही.'
'माई, कोण जिंकलय कोण हरलंय माहीत नाही, पण मी थकलोय, निराश झालोय; असं का घडतंय ? ह्याचा विचार करतो पण उत्तर मिळत नाही. माई, मी थोडा आराम करतोय. सध्यातरी कशावरही काहीही बोलावसं वाटत नाहीय. '
'तुझी मनोदशा समजू शकते पण तूच आमचं एकमेव आशास्थान आहे, हे विसरु नकोस मुला. अन्यथा बाकीची दोघं...'
असं म्हणताना माईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. आणि सिद्धेश अधिकच
गंभीर झाला माईला आपल्या पोटाशी ओढून घेत म्हणाला, 'मी सांभाळेन सर्व आणि त्या दोघांनाही सांभाळेन. चिंता करु नकोस.' असं म्हणत सिद्धेश आपल्या खोलीकडे वळला आणि माई अप्पा त्याच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अधिकच खिन्न झाले. कुठून सुरुवात झाली होती ह्या दृष्टचक्राची ?