GOOD VIBES GOOD LIFE marathi

Author : VEX KING

ISBN No : 9789352203192

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : NON FICTION

Publisher : Saket Prakashan


आता आहात त्यापेक्षा शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीत रूपांतरित व्हा!
स्वत:वर निखळ प्रेम करायला कसं शिकाल? नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक भावनांत कसं कराल? चिरस्थायी आनंद मिळवणे शक्य आहे का?
या पुस्तकात इन्स्टाग्राम गुरू वेक्स किंग तुमच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देतील. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून वेक्स यशस्वी झाले आणि हजारो तरुणांसाठी दीपस्तंभ ठरले. आता स्वानुभव आणि अंतर्ज्ञानी सुज्ञपणा यातून ते तुम्हालाही यासाठी प्रेरित करीत आहेत :

  • स्वत:ची काळजी कशी घ्यावी, नकारात्मक ऊर्जेच्या कचाट्यातून कसे बाहेर पडावे आणि स्व-कल्याणास कसे प्राधान्य द्यावे?
  • जागरूकता व ध्यानधारणेसहित सकारात्मक जीवनशैलीच्या सवयी कशा अंगीकाराव्यात?
  • आपले ध्येय प्रकट करा आणि विविध तंत्रांचा वापर करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
  • आयुष्यात महान संधींना आमंत्रित करण्यासाठी स्वत:च्या श्रद्धा कशा बदलाल?
  • भीतीवर मात करा आणि वैश्विक प्रवाहाशी स्पंदने जुळवा.
  • आपला उदात्त हेतू शोधा आणि इतरांसाठी दीपस्तंभ बना.


आपले विचार, भावना, शब्द व कृती या सगळ्यांची पद्धत बदलली की, तुम्ही जग बदलायला कसे सुरू करता हे वेक्स तुम्हाला या पुस्तकातून दाखवतील.
“जे लोक अंधारात रस्ता शोधण्यासाठी चाचपडत आहेत आणि ज्यांना अधिक सुंदर व अर्थपूर्ण आयुष्य जगायचे आहे त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल.”
- लेविस होवेज,
न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलिंग लेखक व ‘द स्कूल ऑफ ग्रेटनेस’ या पॉडकास्टचे सूत्रधार

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories