RAHASYA vedanchay shikvanichae

Author : STEPHEN KNAPP

ISBN No : 9788196560065

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : DEVOTIONAL ( ??????? )

Publisher : ABC BOOK COMPANY


वेदांच्या शिकवणींची रहस्ये हे पुस्तक प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे एक अत्युत्कृष्ट पुनरावलोकन घडवते आणि अतिशय भारदस्त व महत्त्वपूर्ण असे आध्यात्मिक ज्ञान संक्षिप्त स्वरूपात पुरवते. ही कालातीत आणि ज्ञानसमृद्ध करणारी माहिती अतिशय स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत समजावून दिली गेली आहे. आपली आध्यात्मिक जाणीव आणि जागरूकता वृद्धिंगत करू इच्छिणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. हे पुस्तक असे आहे की जे तुम्ही कोण आहात आणि नेमके कशासाठी योग्य आहात याविषयी एक नवीन दृष्टिकोन देते.

हे पुस्तक इतर कोणत्याही धर्मांमध्ये किंवा तत्त्वज्ञानांमध्ये उकल न केले गेलेल्या प्रश्नांची सरळ व स्पष्ट उत्तरे देते आणि विस्तृत व विभिन्न माध्यमात उपलब्ध असलेली जी माहिती गोळा करण्यास एखाद्या व्यक्तीला कित्येक वर्षे लागतील अशी माहिती अगदी संक्षिप्त देण्यात आली आहे. या पुस्तकात उपयोजलेल्या असंख्य वैदिक संहितेतील अनेक वचने हजारो वर्षांपासून त्यांमध्ये समाविष्ट असलेली अंतर्दृष्टी आणि सूज्ञपणा दर्शवतात.

स्टिफन नॅप यांनी भारतातील प्रमुख वैदिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे. त्यांनी ४० वर्षे योगाचे तसेच पौर्वात्य शिकवणींचे अध्ययन केले आहे. त्यांनी भारतभर प्रवास केला असून भारतातील जवळजवळ प्रत्येक पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वाचकांची पसंती लाभलेली वैदिक संस्कृतीवरील १५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि ते यां विषयांवर नियमितपणे व्याख्याने देतात.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories