UDYOJAK KI YASHASVI UDYOJAK

Author : MANOJ AMBIKE

ISBN No : 9789391282219

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : NON FICTION

Publisher : MYMIRROR PUBLISHING HOUSE


प्रत्येक तरुणाचं/ व्यावसायिकाचं यशस्वी व्यावसायिक (उद्योजक) होण्याचं लक्ष्य/स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रचंड कष्टही करतात, परंतु प्रचंड कष्ट करूनही ते फार मोठी झेप घेऊ शकत नाहीत. याचं कारण काय हे उद्योजक की यशस्वी उद्योजक पुस्तक सांगतं. काही व्यावसायिकांसाठी व्यवसाय हा चक्रव्यूह असतो, बऱ्याच वेळा ते चक्रव्यूहात अडकत जातात. पण जो व्यावसायिक हा चक्रव्यूह भेदून बाहेर येतो तोच यशस्वी उद्योजक होतो. उद्योजक की यशस्वी उद्योजक हे पुस्तक चक्रव्यूह भेदून यशस्वी उद्योजक कसं होता येईल हे सांगतं. या पुस्तकात दिलेली सूत्रे जर आपल्या व्यवसायात वापरली तर व्यवसाय निश्चितच नवी उंची गाठेल. हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना उपयोगी आहेच, त्याचबरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील काही मुद्दे * आर यू प्रोफेशनल? * यशस्वी व्यवसायाची ११ सूत्रे * व्यावसायिक टॉप व्ह्यू * ६४ घरं फिरण्याची कला * प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल? * बॉटल नेक * ब्रँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत? * क्रायसेस मॅनेजमेंट * बुद्धिमत्तेतून व्यवसायवृद्धी * कठीण समयी टिकून राहण्याचं रहस्य * हायटेक, जंटलमन वसायिक बना * पैशाचे व्यवस्थापन कसे कराल? * व्यावसायिक यश टिकवायचे असेल तर... हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी व्यावसायिक नाही तर कित्येक कुटुंबांसाठी आधारस्तंभ बनवते. तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येक तरुणांना दिशा मिळेल व भविष्यात तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनायची ऊर्जा मिळेल.

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories