Author : A P J ABDUL KALAM
ISBN No : 9788174349071
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : BIOGRAPHY
Publisher : RAJHANS PRAKASHAN
अनुवाद: माधुरी शानभाग (मूळ लेखक: डॉ. ए पी जे अब्दुल कलाम / सहाय्यक : अरुण तिवारी ) तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे |